Breaking

गुरुवार, ५ मे, २०२२

चव्हाणवाडी वि.का.सेवा. सहकारी संस्थेच्या निवडणुकीकरिता आलेल्या एकूण ३९ उमेदवारी अर्जांपैकी छाननीमध्ये ३८ उमेदवारी अर्ज वैध तर एक उमेदवारी ऊर्ज अवैध*



*चव्हाणवाडी वि.का.सेवा. सहकारी संस्थेच्या निवडणुकीकरिता आलेल्या एकूण ३९ उमेदवारी अर्जांपैकी छाननीमध्ये ३८ उमेदवारी अर्ज वैध तर एक उमेदवारी ऊर्ज अवैध*


टेंभुर्णी/  प्रतिनिधी

चव्हाणवाडी (टें), ता. माढा, जि. सोलापूर येथील ५८५ एवढे सभासद तसेच तालुक्यातील मोठी सहकारी संस्था असल्याने राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्वाची असलेल्या चव्हाणवाडी वि.का.सेवा. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून त्यानुसार दि. २९/०४/२०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सदर मुदतीपर्यंत एकूण ३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले होते. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण ०८ जागेसाठी २२ अर्ज दाखल आहेत, महिला राखीव मतदारसंघासाठी असलेल्या २ जागेसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल आहेत, अनुसूचित जाती/जमाती साठी असलेल्या एका जागेसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. इतर मागासवर्ग मतदारसंघासाठी असलेल्या एका जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज, तर भटक्या विमुक्त जागेसाठी ५ अर्ज असे एकूण ३९ अर्ज दाखल झालेले होते. उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया दि. ०२/०५/२०२२ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये घेण्यात आलेली होती. त्यामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातील तिसऱ्या आघाडीचे उमेदवार श्री. अण्णासाहेब गोरख इंदलकर यांचेकडे थकबाकी असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आलेला असून इतर ३८ अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत.

            राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या चव्हाणवाडी वि.का.सेवा. सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये कै. रघुनाथ आबा चव्हाण यांची असलेल्या, तंटा मुक्तीचे अध्यक्ष श्री. अरुण बापू चव्हाण यांची पार्टी व माजी सरपंच श्री. अशोक बापू मिस्कीन यांची पार्टी अश्या दोन्ही पार्ट्या एकत्र येवून निवडणूक लढवत असल्याने त्यांनी जोरदार कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्यातच तिसरी आघाडीचा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एकमेव उमेदवार श्री. अण्णासाहेब गोरख इंदलकर यांचा अर्ज बाद झाल्याने ती जागा बिनविरोध होण्याची शक्यता  आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १८/०५/२०२२ पर्यंत असून १८ तारखेपर्यंत कुठल्या मतदार संघामधून कोण-कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याबाबतचे चित्र १८ तारखेला स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा