*रांझणी विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अतुल जाधव यांची तर गायकवाड यांची बिनविरोध निवड*
टेंभुर्णी : प्रतिनिधी - माढा तालुक्यातील रांझणी विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आ.बबनराव शिंदे व आ. संजयमामा शिंदे गटाचे अतुल शिवलाल जाधव यांची तर दशरथ काशिनाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक वेताळा जाधव व मावळते चेअरमन सौदागर पोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत बारापैकी १२ संचालक मोठया मताधिक्याने निवडून आले होते.तर एकजण बिनविरोध निवडून आला होता.
चेअरमन निवडीनंतर एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण व फटाक्यांची सलामी देऊन निवडीचा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक वेताळा जाधव,मावळते चेअरमन सौदागर पोळ,नूतन चेअरमन अतुल शिवलाल जाधव,व्हाईस चेअरमन दशरथ काशिनाथ गायकवाड,संचालक नितीन बागल,तुकाराम चौगुले,संपत शिंदे,संतोष यादव,वासुदेव बागल,संतोष मदने,बाळासाहेब जाधव,संचालिका सिंधू चौगुले,संचालिका पद्मिनी इंदलकर व शिवाजी ढगे यांच्यासह
विश्वनाथ बागल,प्रभाकर बागल,माजी सरपंच विलास जाधव,वसंत चौगुले,किसन जाधव,बाळासो यादव,बाळासो जाधव,राजाभाऊ नलवडे,सुरेश पाठक,नारायण गायकवाड,अंकुश मदने,औदुंबर जाधव,प्रशांत तांबिले,भागवत इंगळे,सौदागर जगताप,अशोक बागल,दत्तात्रय यादव,तुकाराम राखुंडे,आप्पा यादव,अण्णा चौगुले,भागवत यादव,दादा माने,खंडू कदम,खंडू यादव,महादेव पोळ,भाऊ जाधव,नितीन चव्हाण,प्रशांत जाधव,सुभाष तकिक,भैय्या जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांचे आ.बबनराव शिंदें,आ.संजयमामा शिंदे,दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिह आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा