Breaking

रविवार, ८ मे, २०२२

माळशिरस तालुक्यातील गावांना 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 75 लाख रुपयाचा निधी मंजूर* - आ.बबनदादा शिंदे.



*माळशिरस तालुक्यातील गावांना 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 75 लाख  रुपयाचा निधी मंजूर* -   आ.बबनदादा शिंदे.


 
बेंबळे।प्रतिनिधी।                       
 

माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यामधील गावांतील गावाअंतर्गत मुलभुत सुविधा पुरविणेच्या राज्य सरकारच्या 2515  या योजनेतंर्गत विकासकामे करणे करीता ग्रामीण भागातील कामासाठी 75 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती  आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.


             याबाबत सविस्तर माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते  काँक्रीटीकरण करणे, वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार  करणे, सामाजिक सभागृह, हायमास्ट दिवा बसविणे या सारखी अनेक  विकासकामांसाठी  शासनाकडे निधी मिळणेसाठी  मागणी केलेली होती. त्यास राज्य शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यातील विविध गावच्या  विकास  कामासाठी 75 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.

              यामध्ये  माळशिरस तालुक्यातील 1) लवंग - 10 लाख, 2) वाघोली -10 लाख 3) उंबरे (वे)-10 लाख, 4) कोंढारपट्टा - 10 लाख, 5) मिरे- 10 लाख, 6) वाफेगांव-5 लाख, 7) जांभूड - 10 लाख, 8) नेवरे - 10 लाख रुपये याप्रमाणे कामाचा  सामावेश आहे.

                 सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे  सहकार्य मिळाल्याचे सांगून  निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण कत्ररून  कामे  सुरू करण्यात येणार असल्याचे आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा