Breaking

मंगळवार, ३१ मे, २०२२

मांगी सोसायटीच्या निवडणुकीत माजी आमदार बागल गटाचा दारूण पराभव, आमदार शिंदे समर्थक सुजीत बागल गटाचा दणदणीत विजय*



*मांगी सोसायटीच्या निवडणुकीत माजी आमदार बागल गटाचा दारूण पराभव, आमदार शिंदे समर्थक सुजीत बागल गटाचा दणदणीत विजय*


करमाळा प्रतिनिधि : मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन सुजीत बागल यांच्या गटाच्या ११जागा व विरोधी बागल गटाच्या २ जागा विजयी झाल्या . स्वतःच्याच गावातील या पराभवामुळे बागल गटाला राजकीय दृष्टया हा फार मोठा धक्का मानला जात आहे .प्रारूप मतदार यादीपासून ते नामनिर्देशन छानणी प्रक्रियेपर्यंत झालेल्या कायदेशीर लढाईमुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते . दस्तरखुद्द माजी आमदार शामलताई बागल यांचा स्वतःचा उमेदवारी अर्ज देखील बाद झाला होता .  एकुण ४१७ पैकी ३८४  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते राजेंद्र बागल ( १९२ ), दिवाण बागल ( १९२ ), संभाजी बागल (१९० ), सुजीत बागल ( १९९ ), वैभव बागल ( १८८ ), विठ्ठल बागल ( १७६ ) दिलीप बागल( १७३ ), उमेश बागल ( २०४ ), अश्विनी बागल ( २१० ), प्राची नलवडे ( १८७ ), मंगल खरात ( १९४ ) ,सुजीत बागल ( २११ ), अभिमान अवचर ( १९९ ) यांचा समावेश आहे . सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप , करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप, युवानेते शंभुराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस .के . मुंढे यांनी काम पाहीले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा