Breaking

बुधवार, १ जून, २०२२

कृषी कर्ज मित्र म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया अंदुर शाखेत शिवाजी कांबळे यांची नियुक्ती,


कृषी कर्ज मित्र म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया अंदुर शाखेत शिवाजी कांबळे यांची नियुक्ती,



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


अणदूर- महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील होतकरू अभ्यासू पत्रकार शिवाजी कांबळे यांची कृषी कर्ज मित्र म्हणून दिनांक 1/6 /2022 रोजी निवड .तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक गट विकास अधिकारी एम एस राऊत  साहेब कृषी विस्तार अधिकारी डी.एस . नडगिरी साहेब विस्तार अधिकारी अशोक काळे साहेब विस्तार अधिकारी एस.बी. तांबोळी साहेब विस्तार अधिकारी एस एम पिंपळकर साहेब विस्तार अधिकारी एन जी कुलकर्णी साहेब व तालुक्यातील उमेद च्या महिला सदस्या तालुक्यातील सर्व बँकेचे अधिकारी व कृषी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी राऊत साहेब यानी कृषी कर्ज मित्र याना करावे लागणारे काम तसेच शेतकर्याना जास्तीत जास्त कर्ज मिळवून देण्यासाठी बँकेच्या मॅनेजर व संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क खात राहून शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणातील कागदपत्र जमा करणे त्यांची फाईल तयार करून बँकेत लिहून देणे आणि मंजूर करणे इथपर्यंत ची सर्व माहिती त्यांनी सांगितली यावेळी विस्तार अधिकारी डी एस नडगिर कृषी कर्ज मित्र शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी एस बी तांबोळी साहेब यानी कार्यक्रमाची सांगता व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा