मंगळवार, ३ मे, २०२२
टेंभुर्णी येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
टेंभुर्णी (प्रतिनिधी) टेंभुर्णी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली टेंभुर्णी येथील टिळक रोड येथे लिंगायत समाज व टिळक रोड मित्र मंडळ यांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी टेंभुर्णी मधील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामधे टेंभुर्णी गावचे विद्यमान सरपंच प्रमोद कुटे, भाजप चे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, काँग्रेसचे माढा तालुका प्रभारी ऋषिकेश बोबडे, उपसरपंच धनाजी गोंदिल, अनिल तोडकर,ग्रामपंचायतीचे सदस्य जयवंत पोळ, गिरीश ताबे, युवराज शिंदे गुरुजी, बापू भोसले, नागपपां ऊनी तसेच पत्रकार अनिल जगताप, संतोष वाघमारे, गणेश चौगुले, सूरज देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांचे मूर्ती चे पूजन करून अभिवादन करण्यात आले या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिळक रोड व लिंगायत समाजाततील संतोष कानडे, संजय होदाडे, सतीश होदाडे, आनंद स्वामी, नागेश आवटे, सचिन ताबे, उमेश ताबे, अमोल ताबे, नाना होदाडे,राजदीप कानडे, सचिन ताबे, अनिल स्वामी, गणेश भोज, संतोष भोसले, राहुल शिवपुजे, चंद्रशेखर नष्ट, अवधूत कथले आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे यांनी केले तसेच टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने ही बसवेश्वर जयंती साजरी करण्यात यावेळी सरपंच व बहुतांश ग्रामपंचायती चे सदस्य उपस्थित होते या वेळे महात्मा बसवेश्वर यांचे कार्य बद्दल सरपंच प्रमोद कुटे, पत्रकार सचिन होदाडे यांनी आपले विचार व्यक्त करून अभिवादन केले कार्यक्रमाचे आभार अँड. संतोष कानडे यांनी मानले
Tags
# टेंभुर्णी

About अनिल जगताप
Chief Editor of AJ_24_Taas
टेंभुर्णी
लेबल:
टेंभुर्णी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा