Breaking

मंगळवार, ३ मे, २०२२

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी



मनसेच्या पदाधिकाऱ्यांना  नोटिसा जारी


प्रतिनिधी:- अजित चव्हाण

नळदुर्ग:- सद्या देशभरात चर्चेत असलेला विषय हिंदूजननायक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य सरकार करत नाही. हे अनाधिकृत भोंगे उतरवले पाहीजे. अशी सरकारकड़े मागणी करत या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जर सरकारला पाळयच नसेल तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अशी आक्रमक भूमिका घेतल्याने व दि. ४ मे पासून या निर्णयाची अमलबजावणी करावी असे पत्रकच काढून महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिल्याने, पोलिस प्रशासन सतर्क होऊन राज्यभर मनसेच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्याना नोटिसा दिल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर उस्मानाबाद  जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, शहर संघटक आदि सह महाराष्ट्र सैनिकाना,पोलिस ठाणे नळदुर्ग यांनी सी.आर.पी.सी.कलम १४९ प्रमाणे नोटिस बजावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा