Breaking

बुधवार, ११ मे, २०२२

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याशी केले तुळजा भवानी मंदिर संस्थानकडुन गैरवर्तन ,मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक*



*छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याशी केले तुळजा भवानी मंदिर संस्थानकडुन गैरवर्तन ,मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद 

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याशी तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले असुन मंदिर व्यवस्थापक तहसिलदार , धार्मिक व्यवस्थापक यांना निलंबित करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले हे काल रात्री तुळजा भवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांना तुळजा भवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास नियम दाखवत रोखले होते या मुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.परंतु मंदिरातील पावित्र्य आबाधित राहावे मंदिरात कुठला ही वाद नको म्हणुन छत्रपती संभाजीराजे हे देवी दर्शन घेवुन गेले. 

योगिता कोल्हे मंदिर व्यवस्थापक तहसिलदार ....

छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आम्ही आदर करतो त्यांचा अवमान करण्याचा आमचा हेतु नव्हता काल रात्री देवीची अभिषेक धुप आरती झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आले होते देवुल ए कवायते कायदा कलम ३६ नुसार आम्ही अंमलबजावणी केली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा