*डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे आजिनाथ काशीद साहेब यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर :-
कोरोना महामारी नंतर दोन वर्षानी नुकत्याच संपन्न झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त तुळजापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने मिरवणूका काढण्यात आल्या होत्या.या वेळी मिरवणुकी दरम्यान कुठला ही अनुचित प्रकार घडू नये, कसल्याही प्रकारचे वाद -विवाद होऊ नये.अगदी शांततेत मिरवणूका पार पडाव्या या करिता, तुळजापूर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद साहेब API चव्हाण साहेब यांनी कुशल असे नियोजन करून मिरवणूकीला कसले ही गालबोट न लागता संपूर्ण शहर आणि ग्रामीण भागातील मिरवणूका शांततेत पार पाडल्या.यानिमित्त तुळजापूर शहर आणि ग्रामीण भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, पोलीस अधिकारी . चव्हाण साहेब, कांबळे साहेब चासकर साहेब. राकेश बनसोडे साहेब चनशीट्टी साहेब.psi पवार मॅडम यांचा फेटा,शॉल,पुष्पहार,पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे उस्तव समिती आध्यक्ष जिवन कदम.खजिनदार सिद्धार्थ ढाले.मिरवनुक प्रमुख सागर कदम.धम्मशील कदम बाळासाहेब चौधरी.दादा कदम राकेश जेटीथोर, ज्ञानेश्वर बनसोडे, भानुदास साखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आभार व्यक्त करून तसेच पेढे देऊन सर्व पोलिस अधिकारी याचे आभार व्यक्त केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा