Breaking

मंगळवार, १७ मे, २०२२

उमरा येथे छत्रपती संभाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा



उमरा येथे छत्रपती संभाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा


छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा- ह.भ.प इंजि.प्रविण महाराज पिंपळदरीकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा : उमरा ता.लोहा येथे संभाजी ब्रिगेड आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा.स्वप्नील पाटील उमरेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.गुरुराव शंकराव पाटील सिरसाट,उद्घाटक मोहनराव गोविंदराव पाटील सिरसाट प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव पाटील जोमेगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.सतेच दिवसभर संभाजी ब्रिगेड व छत्रपती शंभूजन्मोत्सव समितीच्या आयोजनातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

सायंकाळी ९ वाजता ह.भ.प.प्रविण महाराज पिंपळदरीकर कीर्तनकार,समाजप्रबोधनकार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यांनी आपल्या कीर्तनातून छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म शास्त्राचा सखोल अभ्यास करून चार ग्रंथाची निर्मिती अगदी अत्यल्प काळामध्ये केली त्यामध्ये त्यांच्या विजयाची घोडदौड कुठेच थांबले नाही व वयाच्या 32 व्या वर्षी या स्वराज्यासाठी या देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे जगातील सर्वोत्कृष्ट भूमिपुत्र म्हणून ज्यांची इतिहासाने नोंद घेतली छत्रपती संभाजी महाराज हे चारित्र्यसंपन्न निर्व्यसनी व अजिंक्य योद्धे होते . त्यांचाच आदर्श घेऊन आज युवकांनी मोक्याच्या जागा घेऊन शिक्षण सत्ता अर्थ सत्ता हाती घेऊन ही छत्रपती संभाजी महाराज यांना खरी आदरांजली ठरेल.
मानवतेचा धर्म एकमेकांमध्ये रुजवायचा असेल तर इतर धर्माचा द्वेष करायचा नाही ही संतांची शिकवण आहे म्हणून तरुणांनी जातीय दंगलीमध्ये न पडता संत महापुरुषांची विचारधारा समजून घ्यावी.असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी गायक मारोती महाराज हिंदोळा,बाळू महाराज,श्रीधर महाराज डॉ.दरेगावकर महाराज,आनंद महाराज कापसी,मृदंग वादक दामोदर महाराज विणेकरी,टाळकरी,चोपदार अशोकराव वडजे तर या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार बालाजी पाटील सिरसाट यांनी केले होते.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मा.मधुकर पाटील सिरसाट, विठ्ठलराव पाटील सिरसाट,प्रकाश पाटील सिरसाट छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवाचे आयोजक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,पत्रकार मा.बालाजी पाटील सिरसाट,सचिन पाटील सिरसाट,विठ्ठल परगेवार,गोविंद पाटील सिरसाट, प्रल्हाद मोरे रामेश्वर सिरसाट शेषेराव सिरसाट,बालाजी यलगधंलवार मारुती पवळे शादुल शेख देवराव काऊलगावे माधवराव पांचाळ भाऊराव काउलगावे आनंदराव सिरसाट विजय पांचाळ अंगद वडजे ज्ञानेश्वर गायकवाड मारोती वडजे,तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पवन सिरसाट विष्णू यलगंधलवार यश राठोड श्रीकांत सिरसाट गोविंद सिरसाट,बालाजी सिरसाट,स्वप्नील सिरसाट,अभिजित सिरसाट, शहाजी हनुमंत ढगे यांच्या सह शकडो शंभूभक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांना  अभिवादन करून विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा