छ.संभाजीराजांचा आदर्श युवा पिढीने डोळ्यासमोर ठेऊन जीवनात वाटचाल करण्याची गरज - साक्षी निकम
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
धर्मवीर, शेर शिवा का छावा, अनेक भाषांवर आपले प्रभुत्व मिळवणारे धर्म अभिमानी, संस्कृत पंडित, पराक्रमी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक विशेषेज्ञ देऊन ही ज्यांची कीर्तीचे व पराक्रमांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात अशा छत्रपती संभाजीराजांचा आदर्श युवा पिढीने डोळ्यासमोर ठेऊन जीवनात वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिव व्याख्याती कु.साक्षी निकम हिने केले.
जांब (ता. खटाव ) येथे छावा पतिष्ठाण यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानाप्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना कु साक्षी निकम बोलत होती. कार्यक्रमाला सरपंच अमित मदने, माजी सैनिक उदय शिंदे व छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक घाडगे,आदित्य शिंदे,अभिजीत शिंदे,विश्वजीत भोसले व मयुर शिंदे उपस्थित होते. कु साक्षी पुढे म्हणाली, छत्रपती संभाजी महाराज नीट कळण्यासाठी त्यांचा खरा इतिहास युवकांच्या समोर येण्याची गरज आहे. संभाजी महाराजांचे संघर्षमय जीवन व त्यांनी केलेल्या पराक्रमाची उंची हिमालयाएवढी असतानाही दुर्दैवाने त्यांच्याबाबत नको त्या गोष्टी समाजात पसरवण्यात आल्या. त्याकडे युवकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन साक्षी निकम हिने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शिवलींग शिखरे यांनी केले तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले. तत्पूर्वी छावा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून किल्ले अजिंक्यतारा येथून ज्योत आणली व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
फोटो
जांब: ता. खटाव येथे छावा प्रतिष्ठाण यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना कुमारी साक्षी निकम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा