नळदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईद मिलन संपन्न
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- नळदुर्ग शहर हे हिंदु--मुस्लिम एकतेचे प्रतीक असुन शहरामध्ये हिंदु--मुस्लिम धर्मियांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात असे राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात बोलताना म्हटले.
नळदुर्ग येथील एस. के. फंक्शन हॉल मध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईद--मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबबु शेख व नगरसेवक मुश्ताक कुरेशी यांनी केले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण,राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जिवनराव गोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, जि. प.सदस्य महेंद्र धुरगुडे,प्रकाश चव्हाण माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, अणदुरचे सरपंच रामचंद्र आलुरे, नगरसेवक शहेबाज काझी, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, विजय सरडे, मसुद शेख, भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भुमकर,मेनोद्दीन इनामदार, आलेममोहम्मद रजा, हाफीज शब्बीर अहेमद शेख, माजी नगरसेवक इमाम शेख, संजय मोरे, किशोर नळदुर्गकर, अंबाबाई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश जाधव,सरदारसिंग ठाकुर. भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुभद्राताई मुळे, महिला काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा कल्पना गायकवाड, मनसेचे ऍड. मतीन बाडेवाले,सामाजिक कार्यकर्ते अझहर जहागिरदार यांच्यासह हिंदु--मुस्लिम नागरीक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी नागरीकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नगरसेवक मुश्ताक कुरेशी यांनी केले तर आभार महेबुब शेख यांनी मानले. यावेळी उपस्थित नागरीकांना शिरखुरमा व भोजन देण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा