Breaking

रविवार, २२ मे, २०२२

मोहोळ- पंढरपूर रस्त्यावर पेनुर जवळ भीषण अपघातात ६ जण जागीच ठार तर १ जण गंभीर*



*मोहोळ- पंढरपूर रस्त्यावर पेनुर जवळ भीषण अपघातात ६ जण जागीच ठार तर १ जण गंभीर*



मोहोळ पंढरपूर रस्त्यावरील पेनूर हद्दीतील माळी वस्तीजवळ MH13 DC – 1242 गाडीची व तसेच MH13 BT- 8701 या कारची रविवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक होवून भीषण आपघात झाला. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे.
या भिषण अपघातात मृतांमध्ये मोहोळ येथील खान कुटुंबातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती प्राथमीक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने. समोरून दोन्हीही वाहने पूर्णपणे चपटी झाली आहेत. त्यामुळे या वाहनांतील मृतांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहिल्यने त्यांचा मृत्यु झाला आहे.
अपघाताची माहिती मीळताच मोहोळ पोलिस घटना स्थळी त्वरित पोहोचले. अपघातग्रस्त मृतदेह उत्तरीय प्रक्रियेसाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. मोहोळ – पंढरपूर राज्य रस्त्यावरीलअपघातग्रस्त वाहने व वाहतुकीला अडथळा करणारी वाहने. रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा