*आश्रम शाळेतील 1200 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश,गणवेश, शै. साहित्य देऊन खाजगी शाळांसमोर कैलास सातपुते यांचे मोठे आव्हान*
टेंभुर्णी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत*
टेंभुर्णी प्रतिनिधी/ गणेश चौगुले
येथील श्री संत रोहिदास प्राथमिक, आणि जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळेत मुलांना मराठी वर्गाबरोबरच सेमी वर्गातही मोफत प्रवेश दिला जात आहे.
या मोफत प्रवेशासोबतच मुलांना बोनस तथा बक्षीस म्हणून सुंदर शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्या मध्ये वह्या, पाटी-पेन्सिल, पेन, कंपास पेटी आदी साहित्याचे पहिल्याच दिवशी पूर्णपणे बाराशे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करून आश्रम शाळेचे एक नवा आदर्श उभा सातपुते सर यांनी केला असून यामुळे टेंभुर्णी परिसरातील भरमसाठ फी घेऊन संस्था चालविणार्या संस्था चालका समोर मोठे आव्हान उभे केले आहे अनेक पालकांनी मोफत शिक्षण मिळत असल्याने आश्रम शाळेत मुले टाकण्याचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे
गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी मुळे आर्थिक कंबरडे मोडलेला गरीब पालक वर्ग भरमसाठ फी च्या भीतीने हैराण झालेला होता .
अशातच अडचणीच्या काळात येथील श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री संत रोहिदास प्राथमिक व जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रम शाळेतील जुन्या व नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वह्या पेन कंपास पेटी आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
मूळचाच शैक्षणिक दर्जा उत्तम असणाऱ्या आणि दहावी बारावीत शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासणाऱ्या टेंभुर्णी आश्रम शाळेतील हा नवा उपक्रम म्हणजे दुधात साखर असल्याचे मत जाणकारांमधून व्यक्त होताना दिसते आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीत शाळा बंद असल्याने मुलांचा शाळेशी संपर्क जवळपास तुटलेलाच होता.त्यांना पुन्हा शाळेची गोडी लागावी, शिकण्याची ओढ निर्माण व्हावी म्हणून
मोफत प्रवेशासह गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप करण्याचा स्तुत्य निर्णय संस्थेचे संस्थापक कैलास सातपुते सर यांनी घेतल्याने टेंभुर्णी शहर परिसरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे.
टेंभुर्णी शहर परिसरामध्ये जिल्हा परिषदेसह खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच स्वयं अर्थसहाय्यित आणि इंग्रजी माध्यमांच्या अशा एकूण जवळपास २०-२२ शाळा आहेत.
या सर्व शाळांपैकी फक्त आश्रम शाळेतच मुलांना एक रुपया देखील प्रवेश फी न आकारता मोफत गणवेश वह्या पुस्तके पेन कंपास पेटी चे साहित्य देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे अभिवचन या प्रशालेतील शिक्षकांनी दिले असून भविष्यात आश्रम शाळेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ हा नक्कीच वाढेल यात मुळीच संकोच नाही.
===============================
*चौकट* १
टेंभुर्णी शहर परिसरात अनेक गोरगरिबांची मुले आहेत . ज्यांना दोन वेळेची नीट भाकरीही नीट मिळत नाही. त्यांनी शिक्षण कसे घ्यायचे...??म्हणूनच जवळपास १२००हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन वरून बक्षीस म्हणून गणवेश वह्या पुस्तके कंपास पेटी ,पेन देऊन
सर्वांनाच शिक्षण प्रवाहात खेचून आणण्याचा मानस आम्ही निर्माण करत आहोत.
श्री कैलास सातपुते सर
संस्थापक श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी
*चौकट* २
👇🏼दहावीनंतर मुलांना उच्च शिक्षणासाठी भरमसाठ खर्च करावा लागतो. अगदी पहिलीपासूनच खर्च करणं अतिशय अवघड गोष्ट झाली असून उच्च शिक्षण कसे पूर्ण करणार....???
प्रश्न पालकांसमोर आ वासून उभा हे असताना शिक्षण महागडे झाल्याने शिक्षणाचा मांडला जाणारा बाजार कधी थांबणार ....???
श्री शंकर पवार (एक पालक टेंभुर्णी)
*चौकट*. 3
आमची शाळा 100% गुणवत्तेचे वचन देणारी शाळा असून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा घेऊन टेंभूर्णी शहर परिसरात एक नवा आदर्श उभा करणार आहोत.ज्ञान, कला , कौशल्यासोबतच मुलांचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्वांगीण विकास करण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत.
नवनाथ नांगरे सर (शिक्षक)
सांस्कृतिक विभाग प्रमुख
संत रोहिदास प्राथमिक शाळा टेंभुर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा