Breaking

शनिवार, ४ जून, २०२२

पिलीव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड*



*पिलीव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड*





 पिलीव -प्रतिनिधी/ प्रमोद भैस-माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी कोरे एस व्ही यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नुतन संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चेअरमन पदासाठी संग्राम नारायण पाटील यांचा तर व्हा चेअरमन पदासाठी प्रा सुग्रीव लेंगरे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे चेअरमन व व्हा चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवडी झाल्या.या निवडीवेळी संचालक आनंद पाटील, पंकज मदने, कुबेर भैस,महादेव सुळे, नबाजी मदने, पोपट गोडसे, रंजना जावळे, सुलाबाई जरग,जाफर मुलाणी,किसन सातपुते, विठ्ठल मदने सर उपस्थितीत होते. निवडीवेळी माजी जि प सदस्य गणेश पाटील, नजीर मुलाणी,सिताराम धायगुडे, बाबुराव पाटील, गोरख जरग,गोवींद भैस, अरुण मदने, शयामतात्या मदने, सदाशिव मदने, दशरथ जरग,बाबुराव कदम,प्रमोद भैस, संजय पाटील, वामन गलांडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस व्ही कोरे यांनी तर सहहयाक म्हणून सचिव निंबाळकर यांनी काम पाहिले तर मदतनीस म्हणून विजय सपाटे यांनी काम पाहीले. निवडीनंतर चेअरमन, व्हा चेअरमन व सर्व नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर नुतन चेअरमन संग्राम पाटील यांनी आपण सर्व संचालकांना सोबत घेऊन संस्थेची वसुली शंभर टक्के तसेच सर्व सभासदांना कर्ज देऊन त्याची वेळेत परत फेड करून संस्था नावारुपाला आणणार असल्याचे सांगितले.      फोटो -पिलीव विकास सेवा सोसायटी नुतन चेअरमन संग्राम पाटील, व्हा चेअरमन सुग्रीव लेंगरे व इतर सर्व संचालक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा