Breaking

रविवार, १२ जून, २०२२

उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध मद्य विरोधी कारवाई.”



अवैध मद्य विरोधी कारवाई.”



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


उस्मानाबाद पोलीसांनी काल शनिवार दि. 11 जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 20 कारवाया करुन गुन्ह्यातील हातभट्टी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ नाशवंत असल्याने पोलीसांनी तो जागीच ओतून नष्ट केला. तसेच अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 20 गुन्हे नोंदवले आहेत.

1) भूम पोलीसांनी दोन ठिकाणी छापे टाकले असता सुनिल यादव हे ईराचीवाडी येथील आपल्या घरासमोर 15 बाटल्या देशी दारु तर बालुबाई काळे या पारधी पिढी, भुम येथील आपल्या घरासमोर 5,000 ₹ किंमतीचे गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत द्रव पदार्थ बाळगलेले असताना आढळले.

2) तुळजापूर पोलीसांनी तीन ठिकाणी छापे टाकले असता रणजित शेंडगे हे ढेकरी शिवारात 17 बाटल्या देशी दारु, राजकुमार कोरेकर हे मंगरुळ शिवारातील सवारी मठाच्या आडोशाला 38 बाटल्या देशी दारु तर भारत राजपुत हे तुळजापूर येथील लातूर रस्त्यालगत 30 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.

3) उस्मानाबाद (श.) पोलीसांनी उस्मानाबाद शहरात तीन ठिकाणी छापे टकाले असता निलावती काळे या बोंबले हनुमानजवळ गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 200 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या, तुकाराम देवकर हे आठवडी बाराज परिसरात एका शेडमध्ये 140 लि. हातभट्टी दारु तर विनोद मबनसोडे हे 510 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.

4) उमरगा पोलीसांनी तीन ठिकाणी छापे टाकले असता सुखदेव सुर्यवंशी हे चिंचकोट गावातील आपल्या घरासमोर 20 लि. हातभट्टी दारु, अशोक तेलंग हे कसगी गावातील आपल्या घरासमोर 25 लि. हातभट्टी दारु तर अजित पालमपल्ले हे कोळेवाडी येथील एका पानटपरीमध्ये 34 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.

5) कळंब पोलीसांनी तीन ठिकाणी छापे टाकले असता ताई चव्हाण या डिकसळ येथील खडकी रस्त्यालगत गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत 300 लि. द्रव पदार्थ व 3 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या, तोळाबाई पवार या शेळी बाजार मैदान, कळंब येथे गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचा गळ- पाणी मिश्रीत 100 लि. द्रव पदार्थ तर आशाबाई पवार या मार्केट यार्ड, कळंब येथे 40 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

6) वाशी पोलीसांना चिमाबाई काळे या घाटनांदुर येथील आपल्या घरामागे 30 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.

7) तामलवाडी पोलीसांना भगवान निकम हे माळुंब्रा शिवाराती एका ढाब्यामागे 15 बाटल्या देशी- विदेशी दारु बाळगलेले असताना आढळले.

8) मुरुम पोलीसांना नागनाथ गवळी हे आष्टाकासार येथील बाजार मैदानात 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.

9) लोहारा पोलीसांना सोमनाथ मोरे हे हिपरगा (रवा) येथील आपल्या किराणा दुकानात 15 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

10) परंडा पोलीसांना सतिश कारकर हे जवळा (नि.) येथील ईडा रस्त्यालगत एका पत्रा शेडजवळ 23 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

11) अंबी पोलीसांना पप्पु आटोळे हे पांढरेवाडी गावातील भरत आटोळे यांच्या घराजवळ 26 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा