* मोडनिंब च्या तलाठ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
मोहोळ(प्रतिनिधी) :- शेतातील महोगणी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजाराची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
महेशकुमार मनोहर राऊत, तलाठी, सजा- मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर, रा. मेडशिंगी, ता. सांगोला असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांची मौजे मोडनिंब येथे क्र.५२२ वर ५८ आर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीपैकी ४० आर शेतजमीनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत सात बारा उताऱ्यावर पिकपाण्याची नोंद घेणेकामी मौजे मोडनिंबचे गावकामगार तलाठी महेशकुमार राऊत यांनी तक्रारदारांच्याकडे ४०००/- रुपये लाचेची मागणी करून तो स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे यातील आरोपी याला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा