Breaking

गुरुवार, २ जून, २०२२

कुर्डूवाडी येथील कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालय तिल ,कृषी विस्तार अधिकारी गावडे एक हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात*




* कुर्डूवाडी येथील कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालय कुर्डुवाडी,
कृषी विस्तार अधिकारी गावडे  एक हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात*


 मोहोळ (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद कृषी विभागातील डीबीटी योजने अंतर्गत कडबाकुट्टी साठी अर्ज केलेल्या अर्जदारास तुमचा बँक अकाउंट नंबर चुकला आहे असे सांगून अकाउंट नंबर दुरुस्त करण्यासाठी एक हजाराची लाच घेताना कृषी विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
 संदिप रामदास गावडे, वय ४५ वर्षे, पद- कृषी विस्तार अधिकारी, कृषी विभाग, पंचायत समिती कार्यालय कुर्डुवाडी ता. माढा, जि. सोलापूर.असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या या अधिकाऱ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडीलांचे नावे जिल्हा परीषद सेस अंतर्गत डी बी टी योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशिन अनुदान मिळणेकरीता कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग येथे अर्ज सादर केला असुन सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करीत असताना आलोसे संदिप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग यांनी सदर अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगुन सदर अकाउंट नंबर दुरुस्त करण्याकरीता १०००/- रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती ५००/- रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्विकारलेवरुन त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर, पोलीस अंमलदार / पोना / अतुल घाडगे, पोकॉ/ स्वप्नील सन्नके, पोकॉ/ गजानन किणगी सर्व नेम. एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा