उमरा येथे विश्वशांती नालंदा बुद्ध विहाराच्या पायाभरणीला सुरुवात
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : लोहा तालुक्यातील उमरा येथील विश्वशांती नालंदा बुद्ध विहाराच्या पायाभरणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. विहाराच्या बांधकामासाठी उमरा परिसरातील तालुका व जिल्हा स्तरावरून सर्वधर्मीय बांधवांकडून दान देण्यात येत आहे.दान स्वरूपात गजाळी,वीट,रेती,सिमेंट,गिट्टी अशा प्रकारचे दान दात्याकडून दान मिळत आहे.दानदात्यांच्या दानातून सदर बुद्ध विहाराच्या पायाभरणीचे काम दिनांक २२-६-२०२२ रोजी सुरू झाले असून सदर बुद्ध विहार हे ८६ × १०० च्या शासकीय नोंदणीकृत जागेत होत असून सदर विहाराला पूर्णत्व येण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागणार असून सदर विहाराला लागणारा अंदाजित खर्च १२ लाखापर्यंतचा असून ज्यांनादानाचे महत्त्व कळले असल्यामुळे प्रत्येकाला वाटत आहे की आपण आपल्या कुटुंबासाठी जगत असताना लाखोंची उधळण करतो गाड्या महाड्या शेती बंगले लाखोंची माया जमून ठेवतो पण आपण केलेल्या कमाईचा काही भाग महामानव महापुरुष साधुसंतांच्या विचाराची जुळवणी करणाऱ्या वास्तूला दान केल्याने कुटुंबाला सदगती प्राप्त होते.कारण दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.केलेल्या दानाचे महत्त्व हिरे माणिक मोती याच्या ही पेक्षा मौल्यवान आहे.कारण जगाच्या कल्याणासाठी मानव जातीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या महामानवाने व साधुसंतांनी आपला देह झिजवला सर्वांना समान दृष्टीने बघितले.जात पात का भेदभाव या सर्व गोष्टी अमंगल आहेत त्या फेकून द्या आणि समता स्वातंत्र्य बंधुभाव न्याय स्थापना करा गरजू गरजवंत्यांच्या मदतीला धावून जा जगा आणि जगू द्या असा संदेश दिला.अशा सर्व महापुरुषांना साधुसंतांना इथून अभिवादन केले जाते कारण ते समतेचे पुजारी आहेत अन्याय कापून काढणारे मानवतेचे पुजारी उच्च विचाराचे उच्च दर्जाचे न्यायाचे पुरस्कर्ते अशा महामानवांच्या साधुसंतांच्या विचाराची जुळवणी करणाऱ्या विहाराला सर्व धर्मीय बांधवांकडून दान मिळत आहे. येत्या काही महिन्यात दानातून निर्माण होणारी वास्तू-विहार पूर्णत्वाला येणार आहे.अशी माहिती विश्वशांती नालंदा बुद्ध विहाराच्या समितीचे अध्यक्ष तथा बौद्धाचार्य सुरेश गोविंदराव पट्टेकर गोविंदराव सोनटक्के व्यंकटराव पट्टेकर पी.ए पवार भगवान जोगदंड नितीन पट्टेकर नागोराव पट्टेकर शंकर पट्टेकर सुनील सोनटक्के मधुकर गायकवाड दिलीप पट्टेकर नागशेन जोगदंड रमेश जोगदंड सतीश पट्टेकर शेषराव पट्टेकर उद्धव कांबळे भास्कर पट्टेकर व नवयुवक भीम जयंती मंडळ उमरा यांनी दिली असून दार देणाऱ्यांचे ऋण व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा