Breaking

शुक्रवार, ३ जून, २०२२

*करमाळा भाजपाच्यावतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*


*करमाळा भाजपाच्यावतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*



करमाळा प्रतिनिधि- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त करमाळा भाजपाच्यावतीने संपर्क कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,





यावेळी अॅड भगवान गिरीगोसावी व तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे यांनी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले, 
तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की गावगाड्यातील सर्वसामान्य कष्टकरी ऊसतोड कामगार आणि वंचितांचा बुलंद आवाज होऊन सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला ,आपल्या आक्रमक शैलीतून त्यांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले, सत्तेत असताना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले ,ऊसतोड कामगारांच्या हक्कांसाठी ते अविरत संघर्ष करत राहिले अशा नेतृत्वाचे गुण आपण सर्वांनी अंगीकारून भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असे सांगितले, 
प्रास्ताविक युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस दीपक चव्हाण यांनी केले ,यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे ,युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषीकेश फंड ,सरचिटणीस मयूर देवी ,मिरगव्हाणचे सरपंच मच्छिंद्र हाके ,पांडे गावचे उपसरपंच नितीन निकम, जयंत काळे पाटील, संदीप काळे ,नवनाथ नागरगोजे, विशाल साळुंखे ,आप्पा वाशिंबेकर ,हर्षद गाडे ,सुनील जाधव, किरण बागल, सोमनाथ भागडे ,गणेश गोसावी , विनोद इंदलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा