Breaking

सोमवार, २७ जून, २०२२

जिल्हा पुरवठा विभागाच्या विरोधात अकरा दिवसांपासून विजय पन्हाळकर यांचे उपोषण सुरू ; प्रशासनाचे दुर्लक्ष



जिल्हा पुरवठा विभागाच्या विरोधात अकरा दिवसांपासून विजय पन्हाळकर यांचे उपोषण सुरू ; प्रशासनाचे दुर्लक्ष




करमाळा प्रतिनिधि
करमाळा तालुक्यातील नेरले गावातील हनुमान मंदिरात जिल्हा पुरवठा विभागाच्या विरोधात विजय पन्हाळकर यांचे दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.आज उपोषणाचा अकरावा दिवस असून महसूल विभाग व जिल्हा पुरवठा यांनी दुर्लक्ष केले आहे.उपोषणकर्त्याला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असेही उपोषणकर्त्याने सांगितले आहे.

 नेरले गावातील रेशन दुकान आर्थिक देवाण घेवाण करून जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी नियम डावलून तेजस्विनी बचत गटाच्या सचिव सुरेखा विनायक काळे या दिनांक 21 - 08 - 2021 रोजी मयत झालेले असताना दुकानाच्या प्रस्तावासोबत जो दिनांक 5 / 1 / 2022 रोजीचा गटाचा ऑडिट रिपोर्ट सादर केलेला आहे. त्यावरती बोगस सहया केलेले दाखवून शासनाची फसवणूक करून सदरील दुकान मंजुरीचा आदेश घेतलेले आपले निदर्शनास येईल त्यामुळे संबंधित गटातील सर्व सदस्यांचे विरोधात बनावट कागदपत्रे तयार केल्यप्रकरणी दोषींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून रेशन दुकान निलंबित करावे असा आरोप करत विजय पन्हाळकर यांनी मागणी केली आहे.या उपोषणाला नेरले गावातील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा