Breaking

सोमवार, २७ जून, २०२२

विहिरीची ची पूजा करताना पोकलेन चे बकेट डोक्यावर पडून शेतकरी ठार


विहिरीची ची पूजा करताना पोकलेन चे बकेट डोक्यावर पडून शेतकरी ठार




करमाळा प्रतिनिधि 
करमाळा तालुक्यातील देवळाली येथे विहीर खोदण्याकरता जागेची पूजा करताना पोकलँडचे बकेट अंगार पडून विहीर मालक जागीच ठार झाला आहे. श्रीकृष्ण गुंड असे यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ठार झालेल्या शेतकऱ्याचा मुलगा संदीप श्रीकृष्ण गुंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला  रविवारी (ता. २६) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास गुंड यांच्या शेतात ५८/२/अ/१ येथे विहीरीचे काम करायचे होते. त्यासाठी पोकलँड मशीनच्या मदतीने विहीर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत असताना मशीनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्यावर आणून उभा केले होते. हे बकेट पडल्याने त्यांचा जखमी होऊन मृत्यू झाला.  बकेट अंगावर पडून दुखापत होईल याची जाणीव असतानाही ऑपरेटरने डोक्यावरून बकेट आजूबाजूला केले नाही. ते बकेट वडिलांच्या अंगावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक माहूरकर हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा