अधिकारी घडवण्यासाठी अधिकारी फाउंडेशनचे योगदान उल्लेखनीय- पो.नि सिकंदर वर्धन
प्रतिनिधी इंदापूर /शशिकांत सोनटक्के
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे अश्यात विद्यार्थ्याच्या फी चा प्रश्न बिकट होताना दिसत आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विध्यार्थी बाहेरगावावरून शहरामध्ये येऊन शिकतात अश्या विद्यार्थीची आर्थिक परिस्थिती चांगली असतेच असे नाही या सर्वासाठी आपले सामाजिक उत्तदायित्व लक्षात घेऊन पुणे येथील अधिकारी फाउंडेशन ही सामजिक संस्था जे कार्य करत आहे ते खरेच अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सिकंदर वर्धन यांनी केले ते अधिकारी फाउंडेशनच्या कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी उपस्थित फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की संस्थाचे उदिष्ट गुणवंत विद्यार्थीना प्रोसाहित करून त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहचवणे तसेच त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे आहे ज्या मुलांच्या डोळ्यात उच्च शिक्षण घेण्याची स्वप्न तरळत आहेत हे या उपक्रमाच्या माध्यमातून सत्यात उतरविण्याचा संस्थेचा संकल्प आहे भविष्यात सुद्धा अश्याच प्रकारची आर्थिक मदत करून त्यांच्या जीवनातील लक्ष गाठण्याकरिता त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम करत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिकारी फाउंडेशनच्या या उपक्रमाला समाजातील सर्व स्तरातील लोकांनी समोर येऊन मदत करावी जेणकरून फाउंडेशनला समाजातील तळागाळातील अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थीपर्यंत पोहवण्यास मदत होईल असे अहवान असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दिनेश काशीद यांनी केले. यावेळी उपस्थित पत्रकार अनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा