Breaking

गुरुवार, १६ जून, २०२२

बावडा दूरक्षेत्र हद्दीत अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी;-सात दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल...



बावडा दूरक्षेत्र हद्दीत अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी;-सात दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल...



प्रतिनिधी इंदापूर
 शशिकांत सोनटक्के 

इंदापूर पोलिस स्टेशन  अंकित *बावडा दूरक्षेत्र* हद्दीतील मौजा रेडणी, नीरा नरसिंगपूर, गिरवी, गणेशवाडी इत्यादी ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी दारू  विकत आहेत अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे मा.पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्या आदेशाने रवाना होऊन इसम नामे १. सुभाष वामन चव्हाण, २. नागेश संजय चव्हाण, ३. अजय संभाजी चव्हाण, ४. जयवंत नामदेव हाके वरील चारही राहणार रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, ५. सयाजी महादेव घोगरे राहणार गणेशवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ६. तानाजी जनार्दन भंडलकर, राहणार गिरवी, तालुका इंदापूर जिल्हा पुणे,७. गणेश सहदेव शिंदे, राहणार निरा नरसिंगपूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे वरील सर्व इसम बेकायदेशीर अवैधरित्या देशी- विदेशी तसेच पिण्याच्या पाण्याचा जारमध्ये व प्लॅस्टिक ड्रम मधील हातभट्टी गावठी दारू विक्री करणाऱ्या इसमा वरती प्रोहिबिशन रेड करून एकूण १५८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन बावडा दूरक्षेत्र येथे यांच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय डॉ. अभिनव देशमुख सा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय गणेश इंगळे पोलीस उपाधीक्षक, बारामती विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सपोनि नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक कदम, गायकवाड, कळसाईत, पोलीस शिपाई राखुंडे, विशाल चौधर व बारामती आरसीपी पथक सहाय्यक फौजदार तोंडे व त्यांचा स्टाफ यांनी मिळून केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा