Breaking

गुरुवार, १६ जून, २०२२

कामकाज उत्कृष्ट। ना.डाँ संजय रायमुलकर अध्यक्ष पंचायत राज समिती*



पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केद्राचे कामकाज उत्कृष्ट



निमगाव टे प्रतिनिधी/ दि१६ प्राथमिक आरोग्य केद्रात  रडत येणारा रूग्ण हासत केला पाहीजे मोफत सर्व उपचार मिळत असताना खाजगी दवाखान्यात जाणारे रूग्ण सरकारी दवाखान्यात येतील असे नियोजन करा आरोग्य सुविधा गोरगरिबांना घरापर्यंत पोहचवा पिपळनेर प्राथमिक आरोग्य केद्राचा परीसर स्वच्छ व सुंदर आहे झाडे लावून जगवली आहेत अशीच चांगली आरोग्य सुविधा दया असे आवाहन 
आज येथे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी केले

प्रारभी पंचायत राज्य समितीचे सदस्य आमदार शेखर निकम आ.रत्नाकर गुटटे आ.गजबे अवर सचिव प्रकाश खोंदळे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी स्थानिक लेखा निधी संचालक माधवराव नागरगोजे विधान मंडळ प्रतिवेधक मंगेश कांबळेजिल्हा आरोग्य आधिकारी शितलकुमार जाधव कार्यकारी अभियंता दिपक कोळी गटविकास आधिकारी डाँ संताजी पाटील गटशिक्षणाधिकारी बंडु शिदे  तालुका वैद्यकीय अधिकारी शिवाजी थोरात यांचे समवेत प्राथमिक आरोग्य केद्रातील औषध भांडार शस्त्र क्रिया ग्रह ओ पि डी विभाग क्लाऊड मशीन प्रयोगशाळा याची सखोल तपासणी करून कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले
काही रुग्ण याचेशीही आरोग्य केद्रातील मिळणाऱ्या सुविधा व कर्मचारी उपस्थिती याची चौकशी करून उपयुक्त सुचना केल्या
पिपळनेर आरोग्य केद्राला पंचायत राज समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी भेट दिल्याबद्दल सरपंच आभिमान लोढे माजी जिल्हा परीषद सदस्य संजय डांगे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील केद्र प्रमुख भाऊराव शिदे पोलीस पाटील राहुल पेटकर डाँ प्रमोद बोबडे  चव्हाण  यांनी ऊपस्थित सर्व पदाधिकारी व आधिकारी यांचा सन्मान केला यावेळीप्रयोगशाळा वैज्ञानिक पाटलोजी चव्हाण औषध मिस्त्रक सतीश लोढे आरोग्य सहाय्यक सांळुखे गोडरे गोसावी उईके नलवडेव सर्व कर्मचारी उपस्थित होते .
सुत्रसंचालन रामकृष्ण म्हेत्रे यांनी व आभार ग्रामविकास आधिकारी तात्यासाहेब पाटील यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा