डॉ प्रणाली शिंदेचा धकटवाडी ग्रामस्थाकडून सत्कार
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
निढळ ता खटाव येथील डॉ प्रणाली प्रमोद शिंदे हिने मिरज येथे शासकीय वैद्यकीय महाविदयालयात एमबीबीएस डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल धकटवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने ग्रामविकास अधिकारी एच बी पखाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ प्रणाली प्रमोद शिंदे हि सातारा जिल्ह्यातील निढळ गावची कन्या असून आदर्श गाव निढळमधील प्रथम महिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान डॉ प्रणाली हिने पटकविला असून प्राथमिक शिक्षक प्रमोद शिंदे यांची कन्या तर धकटवाडीचे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ निंबाळकर यांची ती भाची आहे.
या सत्कारावेळी जेष्ठ कार्यकर्ते नारायण जाधव, सरपंच मोहन जाधव, उपसरपंच मोनाली माने, सदस्य शिवाजी निंबाळकर, संतोष जाधव, उषाताई निंबाळकर, सुनंदा जाधव, त्रिंबक महाडिक, कृष्णाजी माने, व्यंकट माने आदिसह मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
धकटवाडी - ता खटाव येथे डॉ प्रणाली शिंदेचा सत्कार करताना श्री पखाले, नारायण माने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा