Breaking

मंगळवार, २८ जून, २०२२

भादलवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री संदेश कन्हेरकर व व्हा चेअरमनपदी लालासो भंडलकर यांची बिनविरोध निवड.



भादलवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री संदेश कन्हेरकर व व्हा चेअरमनपदी लालासो भंडलकर यांची बिनविरोध निवड.


भिगवण प्रतिनिधी :
 भादलवाडी येथील    भादलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदेश कन्हेरकर  यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर व्हाईस चेअरमनपदी लालासो भंडलकर यांनी निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने दहा जागा जिंकून सोसायटीवर बहुमत सिद्ध केले आहे.याच सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वानुमते कन्हेरकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम पी राऊत यांनी काम पाहिले. चेअरमन ,व्हा चेअरमन व संचालकांचा  ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विजयी  उमेदवारांचे राज्य मंत्री दत्तात्रेय (मामा ) भरणे व  मा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अभिनंदन केले  यावेळी इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी  चेअरमन श्री शिवाजीराव कन्हेरकर , शेतकरी संघटना भादलवाडीचे अध्यक्ष श्री नामदेव परकाळे, भादलवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री प्रविण पाटील व बापु भंडलकर ,  बिल्ट कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष श्री अजिनाथ कुताळ भादलवाडी  सोसायटीचे माजी चेअरमन श्री नाथासाहेब कुताळ व श्री काकासाहेब परकाळे , श्री रोहन पिसे  तसेच सोसायटीचे सर्व संचालक , सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा