Breaking

बुधवार, २९ जून, २०२२

माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट


माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट




करमाळा प्रतिनिधि 

महाराष्ट्राच्या राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना आज करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबत भेट झाल्यामुळे करमाळ्याच्या राजकारणात चर्चेला उधान आले असून यावेळी आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील ही बरोबर होते.

आज करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे समवेत मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन यांची भेट घेतली. करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे सध्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर कमालीचे नाराज असून त्यांनी बंडखोर मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे आजच त्यांनी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर मुंबई येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची आज भेट घेतल्याने करमाळा तालुक्याच्या राजकारणात मात्र त्यांच्या भेटीने चर्चेला उधान आले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा