Breaking

शनिवार, १८ जून, २०२२

येरवडा जेलमधील सजा भोगणा-या व सुट्टीवर गावी येऊन परागंदा झालेल्या आरोपीस अटक**



येरवडा जेलमधील सजा भोगणा-या व सुट्टीवर गावी येऊन परागंदा झालेल्या आरोपीस अटक


*

करमाळा प्रतिनिधी 

जेलमधील सजा भोगणा-या व सुट्टीवर गावी येऊन परागंदा झालेल्या कैदी असलेल्या आरोपीस करमाळा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 
मोतीराम मरीबा ओहोळ रा. मिरगव्हाण असे आरोपीचे नाव आहे. 
ही कारवाई करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली  अमोल जगताप , सोमनाथ जगताप ,  हवालदार चंद्रकांत ढवळे,सिध्देश्वर लोंढे यांनी केली आहे .
याबाबत ची हकीकत अशी की,मोतीराम मरीबा ओहोळ याला सात वर्षाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना कोविड काळात पंचेचाळीस दिवस व ६९० दिवस कोरोना काळ अशी रजा त्याने मिळवली होती. यानंतर आरोपी गावाकडे घरी भावाकडे पवन मरिबा ओहोळ यांच्याकडे गेला पण माघारी रजा संपल्यानंतर येरवडा कारागृहात आलाच नाही. त्यामुळे त्यावर येरवडा कारागृह पुणे यांच्या वतीने करमाळा पोलीस ठाण्यात दि १४ जुन रोजी येरवडा कारागृहाचे पोलिस समाधान काशीनाथ जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . 
याबाबत ची हकीकत अशी की,
मोतीराम मरीबा ओहळ रा. मिरगव्हाण 
याला २०१८ मध्ये बार्शी येथील न्यायालयाने त्यास सात वर्ष शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यास अटक करून येरवडा कारागृह पुणे येथे पाठवण्यात आले होते.
मिरगव्हाण ता. करमाळा येथील एका प्रकरणात मोतिराम ओहोळ यांच्यावर ३०४/२ प्रमाणे एकाच्या मृत्युस जबाबदार म्हणुन गुन्हा सिद्ध झाला होता. त्यांना बार्शी येथील न्यायालयाने सात वर्ष व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. ओहोळ यांना पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.
कोरोना देशभर परसला तेंव्हा ओहोळ यांना १५ मे २०२० ते २८ जुन २०२० पर्यंत ४५ दिवसांची कोविड आपत्कालीन आकस्मिक अभिवचन रजा देण्यात आली होती. ती रजा पुन्हा वाढवून ६९० दिवसांची १९ मे २२ पर्यंत ही रजा वाढवण्यात आली होती. ही मुदत संपुन हजर होण्याची १५ दिवसाची  वाढीव मुदत ३ जून २२ पर्यंत संपलेली असताना सदर आरोपी हे पुन्हा येरवडा कारागृहाकडे फिरकलाच नाही. तो पळुन गेला होता. याबरोबरच रजेच्या कालावधीत करमाळा पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या ही सूचना त्यांनी पाळली नाही. अखेर तो मिळून न आल्याने त्यांचा शोध घेऊन करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
दरम्यान गुन्हा दाखल होताच करमाळा तालुक्यातील पोलिसांनी त्याचा शोध घेतला त्या वेळी तो साधूच्या वेशात वेशातंर करून  फिरत असल्याची माहिती  मिळाली.
त्यावेळी ओहोळ हे साधूच्या वेशात गावोगावी फिरत असल्याचे पोलिसांना समजले . 
त्यावेळी त्यांचा तपास करून नातेवाइकांना कडून माहिती घेऊन त्यांचा तपास करून करमाळा पोलीस ठाण्याचे  अमोल जगताप व सोमनाथ जगताप , चंद्रकांत ढवळे, सिध्देश्वर लोंढे  यांनी ओहोळ यांना डोणजे तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणांहून सापळा रचून  ताब्यात घेतले. त्याला करमाळा न्यायालयात उभे करण्यात आले असुन न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात उर्वरित सजा भोगण्यासाठी सोडण्यात येणार आहे. दरम्यान याचा पुढील तपास हवालदार अझहर शेख बालाजी घोरपडे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा