Breaking

शुक्रवार, १० जून, २०२२

लोहगाव येथील गावठाण डिपीसाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या -ग्रापंचायत सदस्य निजाम शेख



लोहगाव येथील गावठाण डिपीसाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या -ग्रापंचायत सदस्य निजाम शेख


प्रतिनिधी:- अजित चव्हाण

लोहगाव:-  तुळजापूर तालुक्यातील मौजै लोहगाव येथील अहिल्यावतीनगर वस्तीस नवीन गावठाण विद्युत ट्रान्सफरसाठी तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे  केली.
या बाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील अहिल्यावतीनगर येथे सध्या विजपुरवठा होत असलेला विद्युत ट्रान्सफर १५ एच पी चा असून त्यावर ओवरलोड जास्त होत असल्याने गेल्या वर्षभरापासून रात्री बेरात्री  विजपुरवठा सारखे  खंडित होतो. तसेच एकदम कमी  होल्टेज असल्याने फॅन, टिव्हि, कुलर, फ्रिज, मिक्सर यासारख्या इतर कोणत्याही इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स चालत नाहित. तसेच येथील अनेक महिला छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करण्यासाठी बचत गट व बॅंकेकडून कर्ज घेवून शिलाई मशीन,पीठाची गिरणी, शेवाई मशिन, अशा अनेक मशनीरी घेतल्या आहेत. परंतू लव होल्टेज विजपुरवठ्यामुळे  मशनीरी चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत.
    मात्र कर्ज काढून घेतलेल्या मशनीरीचा वापरच होत असल्याने बॅकेचे कर्ज परतफेड करण्यासाठी मोठी कसरत होत आहे. यामुळे महिलांसह नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहेत. महावितरणकडे वर्षभरापूर्वी २५ केव्हि तीन थ्री फेस ट्रान्सफरसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. त्याचे इस्टिमेंट प्रमाने प्रस्ताव सॅक्शन झाले आहे. परंतू प्रशासकीय मान्यते अभावी गेल्या वर्षभरापासून विद्युत डिपीचे  काम रखडले आहे.महावितरण व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याकडे महावितरण व  प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून पंधरा दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता देवून कामाचे सुरूवात करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार मैंदर्गी यांच्याकडे दिलेल्या  निवेदनात दिले आहे. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष मारुती बनसोडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा