Breaking

शुक्रवार, १० जून, २०२२

राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त ह.भ.प सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकरांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार*.


*राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त ह.भ.प सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकरांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार*.




*लातूर /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.

*औशात कार्यक्रम, किर्तनांच्या माध्यमातून लोकप्रबोधनांचे कार्य*.औसा
गेल्या अनेक वर्षांपासून दिव्य चक्री भजन व किर्तनांच्या माध्यमातून अविरतपणे लोकप्रबोधनांचे कार्य करणाऱ्या 
औसा येथील नाथ संस्थानचे पाचवे पिठाधीपती ह.भ.प सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांना नुकताच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला.त्याबद्दल औशात जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.सुधीर पोतदार,अल्पसंख्याक सेलचे सचिव मौलाना कलिमुल्लाह साब,तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, सुर्यवंशी,शहराध्यक्ष शकील शेख,अनुसूचित जाती सेलचे बाबासाहेब गायकवाड, हमीद सय्यद, अंगद कांबळे,रवि पाटील, खुंदमिर मुल्ला, मुज्जमिल शेख,भागवत माळी,जयराज ठाकुर,प्रा.ओमप्रकाश झुरुळे,हमीद सय्यद सर,सदानंद शेटे,राजेंद्र बनसोडे, पांडुरंग लटुरे,नियामत लोहारे आदिची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा