आलेगाव बुद्रुकच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा "वंचित" बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
टेंभुर्णी(प्रतिनिधी) आलेगाव बुद्रुक ता.माढा जि.सोलापूर येथे आलेगाव (बु)ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य हनुमंत शेलार यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.सदर प्रवेशप्रक्रिया वंचित बहुजन बहुजन आघाडीचे माढा जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण व जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी विशाल मिसाळ जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी, प्रविण वाघमारे ता.महासचिव,राजेंद्र लोंढे
ता.उपाध्यक्ष,बाळासाहेब हेगडकर ता.उपाध्यक्ष,रवी किर्ते ता.उपाध्यक्ष,राम नवगिरे ता.प्रसिध्दी प्रमुख,विक्रम खरात युवा नेते,राजु वाघमारे युवा नेते, लखन भोसले व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण म्हणाले की,हनुमंत शेलार यांचे वंचित बहुजन आघाडीत पक्षात स्वागत आहे,वंचित बहुजन आघाडी पक्ष सर्वसामान्यांची कदर करणारा राजकीय पक्ष आहे,शेलार यांचा आमच्या पक्षात योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल व सर्वसमावेशक प्रगती साधत असताना सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल.
तसेच यावेळी बोलताना हनुमंत शेलार म्हणाले की, पुरोगामी विचारसरणी व सर्वांना सोबत घेऊन समान न्याय देणारा पक्ष म्हणून मी वंचित बहुजन आघाडीत आज जाहीर प्रवेश केला आहे.भविष्यात पक्षवाढीसाठी तन-मन-धनाने झटण्याचा निर्धार केला आहे.
सदर पक्ष प्रवेशामुळे माढा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी अधिकाधिक मजबूत होत असल्याची चर्चा सर्वसामान्यांमधून ऐकायला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा