बेंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवशंभो आघाडीच्या नमिता अनपट...
बेंबळे प्रतिनिधी: माढा तालुक्यातील बेंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवशंभो ग्राम विकास आघाडीचे उमेदवार सौ. नमिता गोरख अनपट यांची बिनविरोध निवड सरपंच विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
विद्यमान उपसरपंच नाना भोसले यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे उपसरपंच पदासाठी विशेष बैठक घेण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेचे काम ग्रामसेवक मधुकर माने यांनी पाहिले. या निवडीवेळी नमिता अनपट यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिवशंभो ग्रामविकास आघाडीचे पोपट अनपट, माजी सरपंच कैलास भोसले, रत्नाकर कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य विकास अनपट, नाना भोसले, सदस्या राजश्री भोसले, संजिवनी भोसले, शैला किर्ते, छाया लोंढे यांच्यासह दिपक भोसले, समाधान भोसले, शहाजी भोसले, राहूल कुलकर्णी, दत्तात्रय भगत, राजेंद्र जगताप, हनुमंत अनपट, दादासाहेब भोसले, अशोक देवकर, बाळासाहेब कावळे आदींसह शिवसंभो आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा