*शिवजन्मोत्सवा निमीत्त तामलवाडी येथे ३० रक्तदात्यांचे रक्तदान*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न नगर येथे शिवरत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त दि.२२ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरामध्ये गावातील ३० रक्तदात्यानी रक्तदान केले.प्रत्येक रक्तदात्याला मंडळाच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.रक्तसंकलनासाठी सोलापूर येथील मेडीकेअर रक्तपेढीस पाचारण करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिव दत्तात्रय (अप्पुराजे) भोसले, सुधीर पाटील, अध्यक्ष दगडू भाकरे, नागेश घोटकर, तुकाराम गायकवाड, अमोल घोटकर, कृष्णा घोटकर, गोवर्धन नेटके, कृष्णा करंडे,पंकज करंडे, चिंटू घोटकर आदींनी परिश्रम घेतले.सर्व रक्तदात्यांचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा