Breaking

शनिवार, १८ जून, २०२२

उमरा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा व वृक्षारोपण



उमरा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा व वृक्षारोपण


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा येथे दि.१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष चालू झाले असून विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.नियोजनाप्रमाणे शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रारंभी वर्ग पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले.नंतर विविध टप्प्यात बौद्धिक विकास पाहण्यात आला.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा शाळेत राबविणार असल्याचे मुख्याध्यापक व्ही.व्ही.अमनवाड यांनी सांगितले.

तसेच वटपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपक्रमात सहभागी होत,शाळेच्या प्रांगणात गावातील नागरिक रामेश्वर पाटील सिरसाट, केंद्रप्रमुख श्री. कापसे,मुख्याध्यापक श्री.अमनवाड यांच्या हस्ते वटवृक्षाची लागवड करत,त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी पालक रामेश्वर सिरसाट प्रल्हाद शिंदे,ज्ञानेश्वर मुरुड,केंद्रप्रमुख बी.जी.कापसे मुख्याध्यापक व्ही.व्ही.आमनवाड,एम.जी.मेथे,आर.आर.वंगलवार आदींसह पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा