2014 UPSC (CMSC) परिक्षेत भारतात पहिले येऊन महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे पहिले महाराष्ट्रीयन अधिकारी डॉ अनिल खटके
प्रतिनिधी इंदापूर -aj24Taas News साठी
शशिकांत सोनटक्के
(MD) अधीक्षक CGS पुणे यांनी काल अधिकारी फाउंडेशनच्या कामाची महिती घेतली. समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये असे भरपूर मुले आहेत ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही तरी करण्याची इच्छा आहे परंतु त्यांची घरची आर्थिक परिस्थिती व काय केल्याने काय होते या माहितीचा अभाव यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास अडथळा येतो अश्या मुलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठीं अधिकारी फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान शेख आणि अधिकारी फाउंडेशनचे सचिव महेंद्र शेलार यांची या मुलांसाठी धडपड खरचं अभिमानास्पद आहे ग्रामीण व शहरी भागातील हुशार व जिद्दी ज्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे त्यांनी अधिकारी फाउंडेशनच्या "चला अधिकारी घडवूया" या उपक्रमाचा फायदा करून घ्यावा असे आवाहन डॉ अनिल खटके सरांनी भेटीत केले. यावेळी उपस्थित डॉ ओमप्रकाश बोडके (मेडिकल ऑफिसर पुणे), श्रीकांत दीवार (मेडीकल ऑफिसर पुणे) यांनीही अधिकारी फाउंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अधिकारी फाउंडेशन या सामाजिक संस्थामार्फत केल्या जाणाऱ्या कामाचे कौतुक केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा