Breaking

सोमवार, १८ जुलै, २०२२

श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संशोधन आणि विकास या विषयावर मार्गदर्शन



श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संशोधन आणि विकास या विषयावर मार्गदर्शन

         



     मौजे. अकोले (खु) ;ता.माढा. येथील श्री गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात संशोधन व विकास या विषयावर  "डीफजेन फार्मासुटिकल प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद येथील वरिष्ठ संशोधक सुहास देवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

         यावेळी त्यांनी औषध निर्माण शास्त्रात  होणाऱ्या वेगवेगळ्या संशोधनाची माहिती दिली. एखादे औषध बाजारात अणण्यापूर्वी गरजेच्या असणाऱ्या प्रक्रिया जसे कंपाऊंडिंग,मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग, डॉक्युमेंटेशन आणि वेगवेगळ्या रेग्युलेटरी एजन्सीची परवानगी याची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. तसेच संशोधन आणि विकास या क्षेत्रात असणाऱ्या वेगवेगळ्या नोकरीच्या संधीबद्दल माहिती सांगितली. 
       यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे,सचिव. डॉ.आर.डी.बेंदगुडे,प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे तसेच प्रा. महादेवी भोसले,प्रा.सुकुमार लांडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रशांत मिसाळ यांनी काम केले,तर आभार प्रदर्शन प्रा. शिवराज ढगे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा