Breaking

सोमवार, १८ जुलै, २०२२

करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दरोड्यातील फरार आरोपी खाजा काळे अखेर जेरबंद


करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी दरोड्यातील फरार आरोपी खाजा काळे अखेर जेरबंद
करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मो 9850686360


 करमाळा पोलिसांनी आज उल्लेखनीय कामगिरी करून विविध गुन्ह्यातील तसेच दरोडा प्रकरणात हवा असलेला अट्टल दरोडेखोर खाजा काळे यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे
 पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा पोलीस ठाणे कडील तसेच रेल्वेमध्ये दरोडा,जबरी चोरी मधील फरारी आरोपी जिंती भगतवाडी केत्तुर गाव शिवारात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच सपोनी कुंजीर,पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, यांचे पथक रवाना केले.
 वरील पथकाने  पारेवाडी गावच्या शिवारात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा, जबरी चोरी मारहाण मधील फरारी आरोपी खाजा राजेंद्र काळे वय 40 राहणार भगतवाडी तालुका करमाळा यास मोठ्या सिथाफीने अटक केली. सदर आरोपी वर करमाळा पोलीस ठाणे मध्ये भादवि कलम 326 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा, दौंड,कुर्डुवाडी,बारामती येथे आज पर्यंत दरोडा ,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे 11  गुन्हे दाखल आहेत सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरचा आरोपी कोणाला पाहिजे असल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी केले आहे
 सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे ,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हराळे करत आहेत.

चौकट घेणे
करमाळा पोलीस पथकातील डीबी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणते आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मात्र त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा