अकोले-खुर्द येथील पोपट तुळजाराम तोडकर यांचे निधन
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील पोपट तुळजाराम तोडकर (वय-७६) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,तीन मुली,एक भाऊ,बहीण सून,नातवंडे असा परिवार आहे.ते महाराष्ट्र वीरशैव सभा युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ तोडकर यांचे वडील होते.पोपट तोडकर हे दृष्टिहीन असून ही ते ६० वर्षे किराणा व्यवसाय चालवीत होते.ते सांप्रदायिक वृत्तीचे होते.तसेच ते अनेक धार्मिक ग्रंथांचे अर्थ सांगण्यात पारंगत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा