गटशिक्षणाधिकारी राऊत साहेब यांची वाघमोडेवाडी शाळेस भेट
माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. माणिक राऊत साहेब यांनी वाघमोडेवाडी शाळेस अचानक भेट दिली.सोबत घरोघरी शाळा उपक्रमाचे निर्माते व शिक्षण समृद्धी त्रेमासिक संपादक मंडळ सदस्य मा.श्री. संजय खरात होते.
भेटीदरम्यान साहेबांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शालेय परिसराची पाहणी करून शालेय परिसरात वृक्षारोपण करण्याविषयी मार्गदर्शन केले. शालेय परिसर व विद्यार्थी प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.
संजय खरात यांनी वाचन-लेखन तसेच गणितीय उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. वाघमोडेवाडीचे शिक्षक श्री.विनायक पालसांडे यांनी साहेबांना शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली. तसेच साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शाळा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा