Breaking

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रशांत लोंढे यांची निवड.



राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी प्रशांत लोंढे यांची निवड.





भिमानगर प्रतिनिधी/ धनंजय भोसले

पिंपरी चिंचवड _ राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षपदी प्रशांत लोंढे यांची  निवड जाहीर केलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी गुरुवार दि. २१  रोजी महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षपदी सोलापूरचे प्रशांत लोंढे यांची नियुक्ती केलेली आहे. प्रशांत लोंढे हे गेल्या वीस वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांनी अद्याप पर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणारा ब .ना. केसकर आदर्श  कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले होते. ग्रंथालयाचा प्रसार , प्रचार आणि प्रलंबित प्रश्नासाठी  त्यांनी महाराष्ट्र राज्याचा दौरा देखील केलेला आहे. सातारा आणि बीड जिल्ह्याचे ग्रंथालय निरीक्षक म्हणून त्यांनी सक्षमपणे कार्यभार सांभाळलेला आहे. गेल्या वीस वर्षापासून ते निस्वार्थीपणे पक्षाच्या माध्यमातून ग्रंथालयाचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर मंत्रालयात देखील सातत्याने पाठपुरावा करीत असतात . ग्रंथालय क्षेत्रात सातत्याने काम करण्याची त्यांची तळमळ पाहून प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिलेली आहे.
पुढे बोलताना प्रशांत लोंढे म्हणाले की ,  प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिलेली जबाबदारी  ग्रंथालयाच्या न्याय हक्कासाठी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्व सामान्या पर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रामाणिकपणे  प्रयत्न करणार असून ग्रंथालयाचे प्रलंबित प्रश्न वरिष्ठांच्या माध्यमातून सोडविण्यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले. या निवडीबद्दल प्रशांत लोंढे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा