Breaking

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

*मा.आमदार श्री.अभिमन्यू पवार साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण*



*मा.आमदार श्री.अभिमन्यू पवार साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण* 




*लातूर प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.

      औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली तपसे येथे शाळा, ग्रामपंचायत व SBI Foundation तर्फे औसा विधानसभेचे आमदार मा. श्री. अभिमन्यू पवार साहेब यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
    यावेळी मा.आमदार साहेबांनी शाळेची पाहणी केली. शाळा व शालेय परिसर  पाहून समाधान व्यक्त केले. शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.
 यावेळी शाळेतर्फे  आमदार साहेबांचा शाल व चिंचेचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
  यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री. नितीन कवठाळे, ग्रामविकास अधिकारी श्री. जोशी साहेब, शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा