Breaking

बुधवार, ६ जुलै, २०२२

जामगाव सोसायटीच्या चेअरमनपदी रमाकांत कुलकर्णी ; व्हा.चेअरमनपदी राजाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड


जामगाव सोसायटीच्या चेअरमनपदी रमाकांत कुलकर्णी ; व्हा.चेअरमनपदी राजाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड


माढा / प्रतिनिधी-- माढा तालुक्यातील जामगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी रमाकांत कमलाकर कुलकर्णी व व्हाईस चेअरमन पदासाठी राजाराम अनुरथ चव्हाण यांचेच प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस कोळी यांनी दोघांच्याही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

या सोसायटीच्या नूतन संचालक मंडळात दादासाहेब पाटील,सुहास पाटील,जनक चव्हाण,बाबुराव चव्हाण, छगन घोडके,दयानंद तोडकरी,भारत घुले,गोरख चव्हाण, सिंधू गायकवाड,सरस्वती लावंड यांचा समावेश आहे.या निवडीनंतर चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील-जामगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना उपसरपंच सुहास पाटील म्हणाले की, विकास सोसायटीच्या स्थापनेपासून ते आजतागायत बिनविरोध निवडणूकीची परंपरा सुरू आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.सोसायटीची कर्ज वसूली जवळपास 100 टक्के असल्याने सोसायटी नावारूपास आल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी सोसायटीचे सचिव काझी भाऊसाहेब,रमेश चव्हाण,संतोष हिंगमिरे,अमोल चव्हाण,दिपक गायकवाड, गोपीनाथ गवळी,शाहीर चव्हाण,हुसेन शेख,गौतम चव्हाण, विकास चव्हाण,व्यंकटेश कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, संदिपान चव्हाण,लहू चव्हाण,आनंद चव्हाण, विकास तोडकरी,कल्याण तोडकरी यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.

फोटो ओळी- जामगाव ता.माढा येथे सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा