माऊलींच्या भक्तांचे मुस्लिम बांधवांकडून सेवा.पै.पप्पुभाई शेख यांच्या पुढाकारातुन वारकऱ्यांना चहा-फराळ वाटप.
फलटण(प्रतिनिधी-शरिफ काझी)-आषाढी वारीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी माऊलींच्या पालखी सोबत आळंदीहून पंढरपुरकडे निघालेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा विविध स्तरातून होत असते.यामध्ये मुस्लिम बांधवही आघाडीवर असतात.त्याचीच प्रचिती फलटणचे पै.पप्पुभाई शेख यांच्या पुढाकारातून फलटण शहरामध्ये पहायला मिळाले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण शहरात दोन दिवस मुक्कामासाठी आल्यानंतर शुक्रवार पेठ येथील चाँदतारा मस्जिद परिसरात पै.पप्पुभाई शेख यांच्या पुढाकारातून व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने हजारो वारकऱ्यांना मोफत चहा-फराळाचे वाटप करण्यात आले.
मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलेल्या आपुलकीच्या पाहुणचारने वारकरीही भारावून गेले.
या सामाजिक बांधीलकी जपत सर्वधर्मसमभावाचा परिचय देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा