Breaking

रविवार, ३ जुलै, २०२२

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे!!!!! वारकऱ्यांना मोफत औषधांची वाटप!!!!



शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे!!!!! 
वारकऱ्यांना मोफत औषधांची वाटप!!!! 




करमाळा (प्रतिनिधी) करमाळा शहरातून जाणाऱ्या नाशिकच्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात साठी आलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात आले या शिबिराचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आली होती सलग तीन दिवस हे आरोग्य शिबिर सुरू राहणार आहे

करमाळा शहरातून जवळपास 15 दिंडी सोहळे मार्ग क्रमांक करत असतात यातून जवळपास एक लाख वारकरी पंढरपूरच्या पंढरपूरच्या दिशेने जात असतात
 थंडी .ताप 
खोकला अंगदुखी जखमेवरचा मलम गुडघ्यावरील मलम अंगदुखी डोकेदुखी अशा प्राथमिक आजारावरची औषधे वारकऱ्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे मोफत देण्यात आली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आज शहरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात आले होते

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे समन्वयक व करमाळा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश chivate शिवसेने वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदीप बनसोडे संजय जगताप केशव साळुंखे मारुती भोसले शुभम मोहिते निलेश चव्हाण राजेंद्र मिरगळ सुनील डावर चंदू चव्हाण नाना पवार या पदाधिकाऱ्यांनी औषधाचे वाटप केले


विशेषता गुडगा व कंबर दुखी च्या मलम घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा