Breaking

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

शहीद वीर जवान जयहिंद धोंडीराम मस्के यांची 43 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी



शहीद वीर जवान जयहिंद धोंडीराम मस्के यांची 43 वी जयंती विविध उपक्रमांनी  साजरी



शहीद वीर जवान जयहिंद धोंडीराम मस्के यांची 43 वी जयंती विविध उपक्रमांनी  साजरी करण्यात आली. शहीद वीर जवान जयहिंद मस्के यांच्या प्रतिमा  पूजन व रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा सोलापूर जिल्हा संघटक महामंत्री  माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, 




यावेळी शहीद वीर जवान जयहिंद मस्के यांना NCC कॅंडिडेटने मानवंदना दिली. जयहिंद फाउंडेशन च्या वतीने वीर माता, वीर पिता,वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय जयसिंग मोहिते पाटील   उपस्थित होते. तसेच भाजपा- महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वैद्यकीय विद्यार्थी आघाडी (आयुर्वेदिक विभाग) डॉक्टर सौरभ जी गायकवाड , जयहिंद फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा माळशिरस अध्यक्ष पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष संग्राम जी चव्हाण  ,जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  शाखा बार्शी अध्यक्ष विलास जी गायकवाड  उपस्थित होते. मैत्री  प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण भांगे  तसेच  वीर जवान जयहिंद मस्के व्यापारी संकुल अकलूज मधील  गाळेधारक ग्रामस्थ उपस्थित होते. 



सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिमान गायकवाड, विकास देवकर, किरण चव्हाण, बापू सरतापे, सचिन लोकरे, सतीश वसव, नामदेव कदम, इकबाल सय्यद, प्रशांत गायकवाड, नाना गाढवे, रामभाऊ पवार, राजू सगर आदित्य चव्हाण, विनायक मस्के देविदास भोसले जयराज गायकवाड डॉक्टर शुभम गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा