आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला तुफान गर्दी
हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा-आदित्य ठाकरे
महाड - प्रतिनिधी
शिवसेनेच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा असून ही निष्ठा यात्रा आज रायगडमध्ये दाखल झाली. यावेळी महाडमध्ये छ.शिवाजी चौक येथे तुफान गर्दी जमली होती. या जनसमुदायाला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचा ठाकरे शैलीत चांगलाच समाचार घेतला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जोरदार टीकेची झोड उठवली. यावेळी बोलताना सद्या सुरू असलेले घाणेरडे राजकारण कोणालाही पटलेले नाही. या गद्दारांना धडा शिकवला जाईल असे सांगून महाडच्या गद्दार आमदाराला मंत्रिमंडळ विस्तारात काय मिळालं असा सवाल देखील केला. गेली दोन महिने हे चाळीस गद्दार आमदार स्वतःचा विचार करत फिरत आहेत. अतिृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मात्र हे गद्दार आमदार स्वतःचा विचार करत फिरत आहेत. या लोकांना देण्यात आम्ही काय कमी केलं होत? मानसन्मान दिला तरीही या लोकांनी खंजीर खुपसावा याचे वाईट वाटते असे सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार येताच सर्वप्रथम उद्धव साहेबांनी रायगड किल्ल्याला कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. अलिबाग येथे मेडिकल कॉलेजची स्थापना केली असे सांगून हे सरकार तात्पुरतं आणि बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार असून हे सरकार कोसळणारच असा विश्वास देखील व्यक्त केला. गरजेपेक्षा अधिक विश्वास दिल्याचं दुःख असून चाळीस गद्दाराच्या पाठीशी ईडीचं दडपण आहे. यामुळे हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसैनिकांनी मतपेटीतून आपली निष्ठा दाखवून या गद्दाराना विधानसभेची पायरी चढून देवू नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं
.
यावेळी अनंत गीते यांनी देखील देखील शिंदे गटावर जोरदार टीकेची झोड उठवली. कोर्टाच्या निकालापूर्वी मुख्यमंत्री राजीनामा देतील असा जाहीर विश्वास व्यक्त केला. शिवसेना आपली आई आहे, तिला वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. महाडला शिक्षण मंत्री मिळणार असा टोला देखील शिंदे गटाच्या प्रतोदाना लावला. अलिबाग येथील सभा आटोपून आदित्य ठाकरे सायंकाळी साडेसहा वाजता महाड मध्ये दाखल झाले. तत्पूर्वी या सभेला माजी मंत्री अनंत गीते, आमदार मनोहर भोईर, आमदार राजन साळवी, पोलादपूर संपर्क प्रमुख संजय कदम बबन पाटील, चंद्रकांत धोंडगे, कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, बंटी पोटफोडे, रघुवीर देशमुख, प्रफुल्ल धोंडगे, अमित मोरे, बाळ राऊळ, यशवंत कासार, आशिष फळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. खाडीपट्टा विभागातील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा