सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर येथे स्वातत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पंढरपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमीत्त कार्यकारी अभियंता श्री. डी.एम.गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग,पंढरपूर येथे दिनांक 13/08/2022 ते 15/08/2022 या कालावाधीत तीन दिवस मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करुन विविध कला, क्रिडा व सांस्कृतीक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग,पंढरपूर येथे शनिवार दिनांक 13/08/2022 रोजी सहाय्यक कार्यकारी अभियंता तथा उपकार्यकारी अभियंता श्री ए.ए.यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन त्यांच्या वतीने अल्पोहाराचा कार्यक्रम घेण्यात आला. रविवार दिनांक 14/08/2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रथम लिपिक श्री एच.सी.गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहानंतर त्यांच्या वतीन सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अल्पोहारा ठेवण्यात आला होता.
सोमवार दिनांक 15/08/2022 रोजी स्वातत्र्य दिना निमीत्त कार्यकारी अभियंता श्री डी.एम.गावडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहरण करुन विविध कला क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा,करकंब व रो.ह.यो. (सा.बां.) उपविभाग, पंढरपूर या उपविभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी उत्स्फुर्त सहाभाग घेतला होता. यामध्ये संगीत खुर्ची, बकेट बॉल, लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा, अडथळा स्पर्धा, तसेच डोळे बंद करुन फोटोला टिकली लावणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना कार्याकारी अभियंता श्री डी.एम.गावडे साहेब यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता श्री डी.एम.गावडे साहेब म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पहाता यापुढील काळातही प्रत्येक राष्ट्रीय सनानिमित्त ही परंपरा अखंडपणे चालु ठेवण्यात येणार असून कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुनांना वाव मिळावा व कामाचा ताण कमी होण्यासाठी अशा प्रकारच्या गेट टुगेदर कार्यक्रमांची गरज आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता श्री डी.एम.गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री ए.ए.यादव, उपविभागीय अभियंता श्री डी.व्ही.मुकडे, प्रथम लिपिक श्री एच.सी.गायकवाड तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा