श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
अकोले (खुर्द) प्रतिनिधी.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. गोपाळ बसळे यांनी केले. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन,मणक्याचे विकार, साथीचे रोग, महिलांचे आजार,व अन्य विविध विकारांवर तपासणी, उपचार, औषध पुरवठा करण्यात आला.या शिबिरात कंदरचे डॉ. गोपाळ बसळे (एम.डी. मेडिसिन) यांनी रुग्णांची तपासणी केली.
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध उपक्रम
राबवन्यात येत आहेत. हर घर तिरंगा, हर घर झेंडा या अभियाना अंतर्गत नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जागृती प्रसार व प्रचार करून सर्वांनी घरावर, कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवावा हा संदेश देणे, तसेच विविध सामाजिक सेवा उपक्रमांची माहिती व प्रसार करणे हा या शिबिराचा उद्देश होता.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी. बेंदगुडे,अध्यक्ष ॲड विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्यां डॉ.रूपाली बेंदगुडे, प्रा.प्रशांत मिसाळ, प्रा.सुकुमार लांडे, प्रा.शिवराज ढगे, प्रा.कोमल यादव,प्रा.रूपाली राऊत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत मिसाळ यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा