टेंभुर्णी- बेंबळे -घोटी -चांभार विहीर हा मिनी पालखी मार्ग होणार...खासदार निंबाळकर
बेंबळे ।प्रतिनिधी
टेंभुर्णी- बेंबळे- घोटी- चांभारविहीर या 18 किलोमीटर अंतराच्या ' मिनी पालखी मार्गाचा' प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय सार्वजनिक रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे दाखल केला असून येत्या दोन महिन्यात तो मंजूर होऊन त्याचे काम देखील सुरू होईल, तसेच शिंगणापूर- अकलूज - बेंबळे मार्गे परिते- भेंड- चिंचोली- माढा मार्गे तुळजापूर या रस्त्याचे नियोजन देखील करण्यात येणार असून यासाठी सर्वे करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले असल्याची माहिती माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी बेंबळे येथे जिल्हा परिषद गट आढावा बैठक म्हणून आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले .याप्रसंगी नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या सांगून खासदारांना निवेदने सादर केली .या समस्यामध्ये प्रामुख्याने रस्ते ,वीज, आरोग्य सेवा, एसटी सुरू करणे ,शिक्षण संस्था, शेतीसाठी स्वतंत्र विद्युत ट्रान्सफॉर्मर्स ,पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी अॅरो फिल्टर प्लांट, या परिसरासाठी अत्याधुनिक सोयीने सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय तसेच काही देवतांच्या मंदिरासाठी सभामंडप अशा विविध प्रकारच्या मागण्या व निवेदने नागरिकांनी सादर केली. खासदार नाईक निंबाळकर म्हणाले की आगामी काळात ग्रामीण समस्या तातडीने सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून नागरिकांना याचा प्रत्यय येईल.
या कार्यक्रमात बेंबळ्याचे सरपंच विजय पवार व त्यांचे सहकारी दीपक भोसले यांनी या बागायती परिसरातील विविध समस्या बाबत स्वतंत्रपणे विचार व्हावा अशी मागणी केली. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, माढा तालुका भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे, बेबळे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य व जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती माढा तालुक्यातील भाजपचे नेते शिवाजीराजे कांबळे, बेंबळेतील पोपट अनपट ,रत्नाकर कुलकर्णी, उजनीचे प्राध्यापक सुहास पाटील परित्याचे माणिक लांडे ,सापटण्याचे सरपंच दत्तात्रय ढवळे,नानासाहेब ढवळे, तांबव्याच्या सरपंच सौ. खटकेताई, बबलू काळे,दादामालक भगत ग्रामपंचायत सदस्य िकास अनपट , दीपक किर्ते,भारत कोळी,दादा लोंढे घोटीचे पवन गळगुंडे, बाबा जाधव ,बाळासाहेब कुलकर्णी ,अशोक देवकर ,राजेंद्र जगताप, हनुमंत अनपट, नामदेव भोजने ,गोरख अनपट ,विलास माने आदी मान्यवरांसह घोटी, परिते, कान्हापुरी, करोळे, उंबरे ,हरीनगर ,माळेगाव ,मिटकलवाडी, तुळशी, तांबवे ,वेणेगाव ,अकोले बुद्रुक व पिंपळनेर आदि गावातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे नागरिकांच्या समस्यांच्या जागेवरच ओहापोह चर्चा करून निराकरण करण्यासाठी माढा तालुक्यातील महसूल, कृषी, वीज मंडळ, पाटबंधारे तसेच पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम इत्यादी सर्व विभागातील अधिकारी या आढावा बैठक कार्यक्रमास उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा